Ad will apear here
Next
थरथरत्या ओठांच्या काठी

थरथरत्या ओठांच्या काठी अजून रमतो तोच मारवा 
अजून सुकल्या हातामध्ये तसाच झुलतो शुभ्र चांदवा 

अजून निळ्या आकाशी जमतो तसाच ताऱ्यांचा मेळा 
थकल्या नेत्री पुन्हा चमचमती चांदण्या कितीक वेळा 
आपली पहिली  भेट स्मरता अनुभवतो तसाच गारवा 
अजून सुकल्या हातामध्ये तसाच झुलतो शुभ्र चांदवा 

थकली तनु तरी येतो तसाच उन्मुक्त आठवांचा रेळा 
अजून जीवा मोहवि तसाच आपल्या प्रणयाचा खेळा 
अजुन मनाला धुन्द करितो श्रावणात  पहिला शिरवा
अजून सुकल्या हातामध्ये तसाच झुलतो शुभ्र चांदवा 

अजुन गुंजतो ओसाड वाटेवरी पैंजणाचा हरवला नाद
अजुन देतो क्षितिजा वरुन रेंगाळलेल्या स्म्रुतीना साद
अजुन उजाड  माळरान  करितो  देखणा श्रुंगार हिरवा
अजून सुकल्या हातामध्ये तसाच झुलतो शुभ्र चांदवा 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZYCEE
Similar Posts
आकाश अहं विसरा जग तुमचं आहे
पहाट सौख्यदायी पहाट
पाऊस सरी तुझ्या सवे पावसात संकोच मनाचा सरला उष्ण चहाच्या घोटामध्ये वेगळा गोडवा उतरलादृष्टी भेटती रोजच होई परी दुरून तुझ्या संगे कुठून न जाणे धिटाई आलीपाहता तूज भिजल्या अंगे माझ्याहूनही रसिक खराहा थेंब दिसे पावसाचाकिती वेळ दडून बसलाआधार घेत कुंतलाचातव हास्याच्या पुढती फिके&nb ...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language